न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खडकी (दि. ३० एप्रिल २०१९) :- श्री साई सेवा समितीच्या वतीने खडकीतील श्री विठ्ठल मंदिर, दार्जिगल्ली येथे उद्या बुधवार (दि.१ मे) रोजी सालाबादप्रमाणे ‘श्री साई सोहळा २०१९’ चे आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी श्रीं शिर्डी साई पादुका पूजन सोहळा, होम हवन, पारायण, मध्यान आरती तसेच दुपारी १२.३० वाजता श्री साई महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी श्री साई समिती आयोजित साई भजन सम्राट लव-लवीणा ग्रुपचा साई भजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. तरी परिसरातील नागरिकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन श्री साई सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.











