न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०१९) :- डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज फार्मसी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला. माजी विद्यार्थी आणि सध्याच्या विद्यार्थ्यांमधील दृढता बळकट करण्यासाठी समारे ७० प्रतिष्ठित माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
या मेळाव्याचे उद्घाटन सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या संशोधन आणि विकास विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक निलेश मिरजकर यांच्या हस्ते करण्यात आले. माजी विद्यार्थी हे खरे महाविद्यालयाचे आधारस्तंभ असतात, असे मत मिरजकर यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. नीरज व्यवहारे यांनी मुख्य अतिथीचे अभिनंदन केले. तसेच माजी विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी हातभार लावण्यास आवाहन केले.
माजी विद्यार्थी सचिव डॉ. शुभांगी दसवडकर यांनी आपले मत मांडत माजी विद्यार्थांना वर्षभरात झालेल्या उपक्रमांची माहिती दिली व प्राध्यापक मुकेश मोहिते, सारीका निकम आणि इ. सहकार्यासोबत कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांना माजी विद्यार्थी समितीचे सदस्य असलेल्या बादल सिंह, रोहित कटारिया, प्रणव शेवकर ह्यांचे सहकार्य लाभले.
माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणीना उजाळा दिला. माजी विद्यार्थी समितीचे सदस्य अभिषेक स्वामी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर, माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष प्रज्ञा चौधरी हीने सर्वांचे आभार मानले.











