न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२४) :- राजकारण आणि प्रसिद्धीचा एवढा हव्यास की आपल्या हातून डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना होतेय याचे भानसुद्धा आव्हाड यांना राहिले नाही. मनूस्मृतीचा, संविधान यावर खोट्या व चुकीचा समज समाजात पसरवून जितेंद्र आव्हाड आणि कंपनी महाराष्ट्रात विष कालवण्याचे काम करत आहे.
महामानवाचा फोटो, प्रतिमा कुठेही दिसली तर लहान मुलगाही नतमस्तक होतो आणि आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो दिसू नये हे मोठे आश्चर्य म्हणावे लागेल. चूक मुद्दाम करायची आणि मग माफी मागायची, त्यांची सवय संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. पण त्यांनी केलेली चूक ही अक्षम्यच आहे. त्यामुळे त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करून शिक्षा व्हावी.
त्यांचा या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो. त्यांनी फक्त समाजाची माफी मागून भागणार नाही तर त्यांनी प्रायचित्त म्हणून राजकारणातून निवृत्ती घ्यावी, अशी मागणी भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी केली आहे.











