न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२४) :- काम करत असताना आठव्या मजल्यावरुन खाली पडल्याने कामगाराच्या हानवटी व हात पायाला गंभीर दुखापत होवून तो मयत झाला आहे. मदन प्रदुम्न चौहान (वय २८ वर्षे, व्यवसायः मजूरी (लेबर), रा. बिजी स्पेसेस लेबर कॅम्प गणेश नगर शिंदे वस्ती रावेत) असं मयत कामगाराच नाव आहे.
सुरक्षीततेच्या द्रुष्टीने कोणतेही सुरक्षा रक्षक उपकरणे त्यामध्ये हेल्मेट, बेल्ट, सुरक्षा रक्षक जाळी त्याला पुरविली नाही. ही घटना (दि.०४) रोजी १०.१५ वा. बिजी स्पेसेस साईड, शिंदेवस्ती. रावेत येथे हा प्रकार घडली.
फिर्यादी अशोक केदार चौहान (वय २८ वर्षे, व्यवसायः मजूरी (लेबर) याने आरोपी मनोज गणेश पवार (वय २८ वर्षे व्यव कॉन्ट्रॅक्टर रा. राम नगर चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी २५७/२०२४ भा.दं.वि कलम ३०४(अ) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि टार्फे पुढील तपास करीत आहेत.