न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०२४) :- वडीलोपार्जीत शेत जमिनीच्या ७/१२ वर फिर्यादीच्या वडीलांच्या भावाचे व त्यांचे नाव दुरुस्त करण्यात आले आहे. या सातबारा उताऱ्यावर त्यांची नावे दिसत आहेत. परंतु, ऑनलाईन सिस्टीमला सदर ७/१२ उता-यावर फिर्यादी यांचे नाव दिसत नाही.
तक्रारदार यांचे नाव ऑनलाईन ७/१२ उता-यावर दिसावे, त्यासाठी तडजोडी अंती आरोपी तलाठ्याने २०,००० रुपयेची लाच रक्कम पंचासमक्ष मागणी करुन स्विकारली.
याबाबत निवास काशिनाथ टेमगिरे (वय-२९ वर्षे, व्यवसाय-शेती. रा. शिंदे गाव, वासोली ता. खेड) यांनी आरोपी सतिष संपतराव पवार (वय ५२ वर्षे, तलाठी, सजा वासुली, गाव वासुली ता.खेड जि.पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली.
याबाबत महाळुंगे एम.आय.डी.सी पोलीस ठाण्यात ३७०/२०२४ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि निंबाळकर ला प्र वि पुणे पुढील तपास करीत आहेत.












