न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जून २०२४) :- एकत्रितपणे कट रचत संगनमताने फलॅट विकण्याचे आमिष दाखवले. फिर्यादीबरोबर एम.ओ.यु व अॅग्रीमेंट टु सेल असा कायदेशिर करार केला. त्यानंतर एल. अॅण्ड.टि. फायनान्स कंपनीला ७१,००,००० रुपये भरण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवुन सदर रक्कम फिर्यादीने फायनान्स कंपनीला दिली. तसेच अॅग्रीमेंट टु सेल करण्यासाठी रजिस्ट्रेशन फी ५,८३,००० रुपये भरले. असे ७६,८३,००० रुपये भरल्यानंतर त्या फ्लॅटवरील बँकेचा असलेला कर्जाचा बोजा आरोपी यांनी नील केला. त्यांनी अप्रामाणिकपणे फिर्यादीकडुन आर्थिक फायदा करुन घेतला.
त्यानंतर फिर्यादीबरोबर कायदेशिर कराराप्रमाणे न वागता कायदेशिर करारभंग करीत त्यांची फसवणुक केली. आरोपी यांनी या फ्लॅटचे डीड ऑफ असाईमेंट लिहुन व नोदवुन न दिल्यामुळे व या फ्लॅटचे मुळ कागदपत्रे फिर्यादीस न दिल्यामुळे गृहकर्ज घेतलेल्या अॅक्सीस बँकेला विकत घेतलेल्या फलॅटची कागदपत्रे देता येत नाही. तसेच फिर्यादी यांनी घेतलेल्या कर्जाचा हप्ता ते स्वतः भरीत असुन फिर्यादी यांच्या कुटुबियांना मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रास होत आहे, असं फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि.२३/०५/२०२३ ते आज पर्यंत फ्लॅट नं.४०२, ए बिल्डींग, ओरिएंट या सोसायटी, पिंपळे सौदागर येथे घडला आहे. फिर्यादी अमित अशोक कपुर (वय-४० वर्षे) यांनी आरोपी १) महिला (वय-४३ वर्ष), २) रविंद्र बाजारे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. सांगवी पोलिसांनी २५९/२०२४ भा.द.वी कलम ४०६,४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि भोगम तपास करीत आहेत.












