न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जून २०२४) :- पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात “२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करण्यात येत आहे. २१ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे श्रीनगर येथे स्वतः योग शिबीरात उपस्थित राहणार असून, देश-विदेशातील करोडो जनतेस स्वस्थ जीवन जगण्याची प्रेरणा व संदेश देणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमीत्ताने पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजपातर्फे शहरात ठिकठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी विविध शिबीरांमध्ये सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचे आवाहन संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी केले आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यासह, २३ जून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिन ते ६ जुलै जन्मदिनानिमीत्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. २५ जून आणीबाणी काळा दिवस आणि ३० जून रोजी प्रत्येक बुथ मध्ये “मन की बात” कार्यक्रम आयोजनाबाबत भाजपा मध्यवर्ती कार्यालय, मोरवाडी येथे आज कोअर कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच, मावळ आणि शिरूर लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा करून संघटन मंत्री मकरंद देशपांडे, मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, प्रदेश सदस्य महेश कुलकर्णी, आमदार उमाताई खापरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, संजय मंगोडेकर, शितल शिंदे, अजय पाताडे, शैला मोळक, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस अनुप मोरे, प्रदेश सदस्य मोरेश्वर शेडगे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, संदीप नखाते, प्रसाद कस्पटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त प्रत्येक मंडल स्थानी सार्वजनिक कार्यक्रम शिक्षण संस्था, अन्य सामाजिक संस्थातर्फे शिबीर घेवून, योग शिबीरात व वृक्षारोपण करिता स्थानिक स्तरावरील समाजातील मान्यवर व्यक्ती, कलाकार, खेळाडू यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

















