न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२४) :- बेकायदेशीर जमाव जमवला. दहशत निर्मान करण्याच्या उद्देशाने अपघातातील ट्रकचे केबिन जाळले आहे. हा प्रकार (दि. २२) रोजी ००.३० च्या सुमारास चांदणी चौक ते भुगाव कडे जाणा-या हायवे वरील इंग्सा मार्ट समोर सार्वजनीक रोडवर, बावधन येथे घडला.
याप्रकरणी हिजवडी पोलिसांनी ७७८/२०२४, भा.द.वि.कलम ४३५,४२६, ४२७,१४२,१४३,१४५, १४६,१४७,१४९, क्रिमी लॉ अमेंड अॅक्ट ७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे आरोपी १) मयुर सतिश भरेकर, २) सुरज अनिकांत भरेकर, ३) सचिन शेडगे, ४) शंकर शेडगे, ५) समीर शेडगे, ६) मयुर भालेकर, ७) सुरज भालेकर (सर्व राहणार भुगाव) व इतर ८ ते १० अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सपोनि पुनम जाधव तपास करीत आहेत.


















