न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२४) :- ‘मला येताना जाताना नमस्कार करायचा’, अशी चौघांनी द्वितीय वर्षाचे अॅडमिशन घेण्यासाठी जात असणाऱ्या तरुणाला खुन्नस दिली. त्यावर ‘मला कॉलेजला अॅडमिशन घ्यायचे आहे. माझ्याकडे या गोष्टीसाठी वेळ नाही’. असे तरुणाने म्हटल्यावर चौघांनी मिळुन तरुणाला घाणघाण शिविगाळ करत लाथा बुक्यांनी मारहाण केली.
रस्त्याच्या कडेला पडलेल्या सिमेंटच्या ब्लॉकने तरूणाच्या डोक्यावर, उजव्या कानावर, छातीवर, पाठीवर तसेच उजव्या पायावर मारहाण करीत त्याला जीवे मारण्याची धमकी देवुन गंभीर जखमी केले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २२) रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास राजमाता महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी येथे घडला. संकेत हनुमंत भोसले (वय१९ वर्ष, धंदा-शिक्षण, रा. शास्त्रीचौक, भोसरी) याने आरोपी अनिश पवार (पुर्णनाव पत्ता माहित नाही), व इतर तिन साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ३९८/२०२४, भा.दं.वि. कलम ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोफौ बुढे तपास करीत आहेत.