न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२४) :- कंपनीला ट्रान्सपोर्टकरीता लागणाऱ्या रुपयांमध्ये तसेच खरेदी आयात चलनामध्ये वजनापेक्षा जास्त वजनाचे बील तयार केले. जे सप्लायर कंपनीला कोणतीही सर्विस प्रोव्हाईड करीत नाही, अशांकडे कंपनीचे पैसे वळते केले. तसेच आरोपी क्र.३ यांचेसोबत मिळुन चलनामध्ये वजना पेक्षा जास्तीचे वजन दाखवुन व खोटे चलन तयार करुन संगनमत करुन २०१८ ते २०२३ दरम्यान कंपनीची ०२ कोटी ४५ लाख रुपये रक्कमेच्या किंमतीची अफरातफर करुन रकमेचा अपहार करुन फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि.२८/०९/२०१८ ते दिनांक १२/०६/२०२३) दरम्यान मिंडा वास्ट अॅक्सेस सिस्टम प्रायव्हेट लिमीटेड कंपनी, निघोजे येथे घडली. रविंद्र दत्तात्रेय जगदाळे (वय ४० वर्ष) यांनी आरोपी १) सौरभ लक्ष्मी प्रसाद उपाध्याय (वय अंदाजे ३६ वर्ष रा. आयफेल सिटी, राणुबाई मळा, चाकण), २) उपेंद्र शुक्ला (वय ४४ वर्ष रा. गंधारीनगर, मोशी), ३) अॅक्शन एक्सप्रेसचे संचालक विजय भोसले, ४) जामता इंजिनिअरींग कंपनीचा मालक अरुणकुमार, ५) श्री गणेश ट्रान्सपोर्टचे मालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ३९७/२०२४ भा.द.विकलम ४२०,४०८, ४६७,४६८, ४७१,४७७ (अ), ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि काळे पुढील तपास करीत आहेत.