न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०१९) :- निगडी येथील सेक्टर क्रमांक २२ येथील अमरधाम स्मशानभूमीमध्ये सुरू असलेल्या नव्या विद्युत दाहिनीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडल्यामुळे त्याचा वापर होत नाही.
लाखो नागरिकांच्या लोकवस्तीमध्ये अशा स्थितीतील विद्युत दाहिनीमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, प्रशासनाच्या विरोधात तिरडी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निगडीतील अस्तित्वात असलेली विद्युत दाहिनी वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे नवीन स्मशानभूमी उभारण्याचे महापालिकेने काम हाती घेतले आहे. ते काम कल्याणी एंटरप्रायझेस या ठेकेदाराला दिले होते.
त्यानुसार काही महिने त्यांनी काम चालू केले मात्र, गेल्या दोन महिन्यापासून कामाला गती नाही. कामगार अधूमधून येत असल्याने कामात सातत्या नसल्याने काम रखडले आहे. जुनी विद्युत दाहिनी वारंवार बंद पडत असल्याने, मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
जुनी विद्युत दाहिनी वारंवार बंद पडते. नवीन दाहिनीच्या कामासाठी मी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. यापूर्वी आपलं सरकारला रीतसर तक्रार केली होती. तसेच, अधिका-यांकडेही त्याची विचारणा करीत आहे. मात्र, तेथून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.
– सचिन काळभोर , सामाजिक कार्यकर्तेनवीन विद्यत दाहिनीसाठी सहा महिन्यांची मुदत आहे. ऐंशी टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या दीड महिन्यात त्याचे काम पूर्ण होईल.
– अशोक अडसुळे, कनिष्ठ अभियंता, पिपरी-चिंचवड महापालिका











