न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी अर्ज स्वीकृतीस गुरुवार (दि. २) पासून सुरुवात झाली आहे. अर्ज शनिवार (दि. ४) रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्वीकारले जाणार आहेत.
महापालिकेची अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह ही ८ क्षेत्रीय कार्यालये आहेत. या समितीच्या अध्यक्षांचा एका वर्षाचा कार्यकाळ संपला आहे. अध्यक्षाची निवड (दि. ९) रोजी सकाळी ११.३० वाजता पालिका भवनातील मधुकरराव पवळे सभागृहात पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली केली जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील १६ नगरसेवकांना मतदान करता येणार आहे.











