न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०१९) :- दुचाकी वाहनांच्या ‘ एचपी ‘ मालिका मोटारीसाठी चॉईस क्रमांकाचे अर्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून मागवण्यात आले होते. त्यानुसार मोटारीची यादी आज शुक्रवार (दि. ३) रोजी नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे.
यादीतील अर्जदारांना लिलावाकरिता जास्त रकमेचा डीडी शुक्रवारपर्यंत दुपारी अडीच वाजेपर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
त्यानंतर दुपारी साडेचार वाजता ते क्रमांक देण्यात येतील. तसेच दुचाकीची यादी शनिवारी (दि. ४) रोजी नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे. वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे मेसेज मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून घेऊन जावे, क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी सादर न केल्यास तो क्रमांक रद्द होईल, असे आरटीओच्या वतीने सांगण्यात आले आहे.











