न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ मे २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता दीपक सुपेकर हे मंगळवार (दि. ३०) रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्या पदाचा अतिरिक्त पदभार कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
जुंधारे हे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता आहेत. सुपेकर यांच्या निवृत्तीमुळे त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार सोपविला आहे. तर, शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीमुळे त्यांच्या पदाचा प्रभारी पदभार सह शहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे सोपविला आहे.











