न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२४) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीए च्या आयुक्तपदी योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकार कडून याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.
पीएमआरडीएच्या आयुक्त पदी राहुल महिवाल हे काम पाहत होते. त्यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता योगेश म्हसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांच्याकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत.