न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय अतिक्रमण पथकाने चिखली जाधववाडी येथील शीव रस्त्यावरील फुटपाथवर असणाऱ्या व वाहतूकीस अडथळा ठरणाऱ्या सात टेंपो वाहनांवर जप्तीची कारवाई केली.
आयुक्त शेखर सिंह व अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अतिक्रमण मुक्त फुटपाथ मोहिम राबविण्यात येत आहे.
त्या अंतर्गत उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या नेतृत्वाखाली चिखली येथे ही कारवाई करण्यात आली.
तसेच चिखली मोशी रस्त्यावरील चिखली गावठान येथील वाहतूकीस अडथळा ठरणारे भाजी विक्रेते व हॅाकर्सवर कारवाई केली. मासुळकर कॅालनी येथील रसरंग चौक ते झिरो बॅाईज चौक रस्त्यावरील हिंदुस्थान ॲंटीबायोटीक्स मैदान लगत फुटपाथवर असणाऱ्या पाच झोपड्याही निष्कासित करण्यात आल्या.