न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०२४) :- दोघांनी आपसी संगणमताने बेकायदेशिररित्या चिंचवड येथील दुय्यम निबंधक, हवेली क्र. ५ येथे कुलमुखत्यारपत्र दस्त क्र. ३२८/२०२१ च्या आधारे भेगडेवाडी, ता. मुळशी जि. पुणे येथील जमीन गट नं. ८४, ८६, ८८, ९१, ९२, ९७, ६६६ व ६७३ या मिळकतीचे (दि.२९/११/२०२३) रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, मुळशी पौड यांच्या कार्यालयात कायदेशिर दस्त नोंदवले.
सदर मिळकतीच्या देखभाल, ताबा व इतर महत्वाचे अधिकार आरोपी यांनी फिर्यादी यांना दिले. असं असतानाही आरोपी यांनी त्याच जागेचे पुन्हा (दि. १९/१२/२०२३) रोजी हवेली क्र. १८, पिंपरी या कार्यालयात नोंदविण्यात आलेले दस्त संदिप कस्पटे व आरोपी क्र २ यांना नवीन कुलमुखत्यार पत्राव्दारे अधिकार दिले. फिर्यादी यांचा विश्वासघात करुन त्यांची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी संजय चंदनमल जैन (वय-५७ वर्षे, धंदा-जागा खरेदीव्रिकी व्यवसाय) यांनी आरोपी १) गणेश दगडु पाटील २) महिला आरोपी (रा. वाकड) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिंचवड पोलिसांनी २७३/२०२४ भादवि कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि झिंझुर्डे तपास करीत आहेत.