न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०२४) :- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त श्री संत तुकाराम महाराज व्यापार संकुल व शिवतेज प्रतिष्ठान, निगडी यांच्या वतीने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले.
वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला. तसेच तहसील कार्यालयाकडून माहिती पुस्तिका देण्यात आली. या पुस्तिकेमध्ये पालखी मार्गावर असलेल्या सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक आहेत. या पुस्तिका वारीतील सर्वांच्या वाटचालीत विविध सुविधा उपलब्ध करून देतील.
तसेच निगडीमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना उबाठा गटाचे शहर संघटक संतोष सौंदणकर, शिवतेज प्रतिष्ठान अध्यक्ष सुरेश वाडकर, सुनील म्हासके, पिं.चिं. शहर सचिव ज्ञानेश्वर शिंदे, नुरबागवान शेठ, प्रफुल पोटफोडे, शैलेंद्र परंडवाल, पंडित दगडे, रघुनाथ शेट्टी, ओमप्रसाद परदेशी आदी उपस्थित होते.












