न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जुलै २०२४) :- थेरगाव येथील एम एम ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकणारे पाचजण कासारसाई धरणावर गेले होते. तिथे पोहत असताना एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा धरणात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १९) सकाळी घडली.
सारंग रामचंद्र डोळसे (वय १७, रा. थेरगाव) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी सारंग आणि त्याचे चार मित्र कॉलेजला दांडी मारून कासारसाई धरणावर गेले होते.
शिरगाव पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थांना माहिती दिली. त्यानुसार निलेश गराडे, कुणाल दाभाडे, अविष्कार भिडे, सुशांत नगीणे, विकास दोड्डी यांनी घटनास्थळी धाव घेतली. सारंग याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे.












