न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२४) :- सिध्दीविनायक डेव्हलपर्स या नावाने बनावट कागदपत्रे बनवली. त्यावर खोटया सहया केल्या. फिर्यादीचे सिध्दीविनायक डेव्हलपर्स या नावाने रत्नाकर बँक, भोसरी येथे खाते उघडुन त्यावर ठाणे जनता सहकारी बँक यांचेकडुन ३४,००,००० लाख रूपये व हिरो फायनान्स बँकेकडुन २२,८१,५७९ लाख रूपये कर्ज काढले.
एकाच प्लॅटवर दोन बँकाचे कर्ज घेवुन सिध्दीविनायक डेव्हलपर्स या नावाचा गैरवापर करून, फिर्यादी यांच्या शुभारंभ सोसाकडुन प्लॅट खरेदी करून त्याचे ३१,६०,००० रूपये फिर्यादी यांना न देता ते स्वतःच्या फायदयाकरीता वापरून फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. १०/०९/२०२३ ते दि. १८/०७/२०२४) पर्यंत जमीन गट नंबर २७/१ व २९/१ मधील २७ गुंठे, शुभांरभ बिल्डींग, आळंदी येथे घडली. फिर्यादी महेश कांतिलाल गणात्रा (बांधकाम व्यवसाय) यांनी आरोपी १) विक्रांत विठठल कुडाळकर (वय ३८वर्षे धंदा टेलर रा. चाकण चौक आळंदी ता खेड जि पुणे), २) निलेश लक्ष्मण पळशीकर (वय ३६वर्ष धंदा नोकरी रा. रिव्हरब्रिज प्लॅट नं १०२ मोशी टोलनाका गायकवाडवस्ती मोशी) ३) महेश लक्ष्मण पळशीकर (वय ३२ वर्षे धंदा नोकरी रा. रिव्हरब्रिज प्लॅट नं१०२ मोशी टोलनाका गायकवाडवस्ती मोशी पुणे) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
आंळदी पोलिसांनी २१४/२०२४ भा.न्या.सं. कलम ३१६(२), ३१८ (४),३३६ (२), ३३८,३३६ (३),३४०(२),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अटकेत आहेत. सपोनि साळी पुढी तपास करीत आहेत.












