न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२४) :- शाळेतील लेडिज बाथरुमच्या बाहेरील पॅसेजमध्ये शाळेचा शिपाई आरोपी याने मतिमंद मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिला अश्लील व्हिडीओ दाखवला. तिला मारणेची धमकी देवुन जबरदस्तीने जवळ ओढुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. तिच्यावर वारंवार जबरी संभोग केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १६) रोजी ०९.५५ वा. सुमा. विदयामंदिर शाळेतील कार्यशाळेच्या लेडिज बाथरुमच्या बाहेरील पॅसेजमध्ये घडली आहे. महिला फिर्यादी यांनी आरोपी नारायण कुमाजी ठुबल (वय ५० वर्षे, रा. गणेशनगर मु. बोपखेल) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
निगडी पोलिसांनी ३३०/२०२४ भा.न्या.सं. कलम ६४ (२), (डी) (के) (एम), ६७,७५ मुलांचे लैगीक अपराधा पासुन संरक्षण अधिनीयम कलम ४,६,८, १०,१२,१५ (२) अपंग व्यक्तीचा हक्क कायदा २०१६ चे कलम ९२ (ब) (ड), नागरी हक्क संरक्षण कायदा कलम ७ (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वपोनि माळी पुढील तपास करीत आहेत.















