न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२४) :- पिंपरीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय येथे कार्यालयीन वेळेत गुन्ह्यातील आरोपितांना जामीनासाठी फिर्यादी समक्ष न्यायालयात हजर केले नाही. स्थानिक रहीवाशी म्हणुन फिर्यादीचे बनावट आधारकार्ड झेरॉक्स वापरुन न्यायालयाची दिशाभुल करुन फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. ३०) /०४/२०२४ दरम्यान घडला. फिर्यादी राहुल बबन बनसोडे यांनी १) आरोपीचा जमीन देण्यासाठी हजर असलेले वकील, २) आरोपीच्या जामीनासाठी वकील यांच्याशी संपर्कात असलेले आरोपी यांचे नातेवाईक, अगर मित्र असे अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६६२/२०२४ भा.दं.वि कलम ४६५,४६९,४७१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुदळ पुढील तपास करीत आहेत.












