- पत्नीसह सासऱ्याचा केला विश्वासघात; महाळुंगेतील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२४) :- गॅस एजन्सीचा आर्थिक व्यवहार पाहण्याची आरोपी पतीला फिर्यादी पत्नीने मुभा दिली. त्याचा गैरफायदा आरोपीने घेत व्यवहारापोटी गॅस एजन्सीला प्राप्त होणारी रक्कम गॅस एजन्सीच्या खात्यावर जमा न होवु देता ती रक्कम स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता फोन पे व गुगल पे द्वारे स्वतःच्या बँक खात्यावर स्विकारली.
त्या स्विकारलेल्या रक्कमेतील ३ लाख रुपये पनवेल येथील नृत्यांगना करिना राज व मुस्कान यांना आणि १० लाख रुपयांचे सोने खरेदी करण्याचे अॅडव्हान्स म्हणुन सोनारांना देवुन त्या रक्कमेसह एकुण ३,७४,७९,८४७ रुपयांचा अपहार करुन फिर्यादीसह व त्यांचे वडील सदानंद कांबळे यांचा विश्वासघात केला आहे.
हा प्रकार (दि ०१/०४/२०२३ ते दि १५/०५/२०२४ पर्यंत) महाळुंगे इंगळे येथे फिर्यादीसोबत घरजावाई म्हणुन राहत असताना घडला. महिला फिर्यादी (वय ३४ वर्ष, व्यवसाय गॅस एजन्सी, रा. महाळुंगे इंगळे, ता खेड जि पुणे) यांनी आरोपी हनुमंत रावसाहेब पोटे (वय ३१ वर्ष, रा. पद्मावती मंदीर चिंबळी, ता खेड जि पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एम आय डी सी पोलिसांनी ४४९/२०२४, भा.द.वि. कलम ४०६, ४२० प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वपोनि गिते पुढील तपास करीत आहेत.












