न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जुलै २०२४) :- दापोडीतील सी.एम.ई. ओल्ड सिलींग क्लब बँक साईड परिसरात (दि. २०) रोजी रात्री १.१५ वा चे सुमारास चौघांनी अवैधपणे प्रवेश केला. चंदनाचे झाड कापुन ते चोरी करुन घेवुन जात असताना मिळुन आले. त्यांच्याकडुन चंदनाच्या झाडाचे तुकडे, लोखंडी कु-हाड, करवत, वायर कटर, हिरो होंडा कंपनीच्या २ स्प्लेंडर मो सा असा एकुण ५८,६०० रुपये किंमतीच्या मुददेमालासह ते मिळुन आले आहेत.
याप्रकरणी अशोक संभाजी साठे यांनी आरोपी १) अविनाश शिवनाथ मधे वय २० वर्षे, रा. मु.पो.चास पिंपळदरी, ता अकोले, जि. अहमदनगर, २) राजु डोके, ३) सुश्या (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही), ४) सचिन रामदास गिरे, तिघेही रा. रा. ओतुर, पुणे यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी पोलिसांनी ४५२/२०२४, भा.न्या.सं. कलम ३०३ (२) प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोहवा / ८६४ गारडे पुढील तपास करीत आहेत.















