- बारा वर्षांपासून देहूरोडमध्ये वास्तव्य; म्यानमारचे घुसखोर जेरबंद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२४) :- चौघेजण म्यानमारचे नागरीक आहेत. त्यांनी घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केला होता. म्यानमार देशातून भारतातमध्ये प्रवेश करताना त्यांनी म्यानमार सिमेवरील मुलकी आधिका-यांची लेखी परवानगी घेतली नव्हती. रेफ्युजी म्हणून कोणताही वैध दाखला त्यांच्याकडे नव्हता. असे असताना त्यांनी देहूरोड येथील एम बी कॅम्प परिसरात तब्बल बारा वर्षे अवैधरित्या वास्तव्य केलं.
पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथक, पुणे युनिट यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी (दि. २६) रोजी दुपारी १.०० च्या दरम्यान कारवाई करीत दोघांना ताब्यात घेतले आहे.
१) शाहीद उर्फ सोहिददुल उर्फ स्माईली कालुस्लाम शेख, शाहीद इस्लाम (वय ३५, रा. राकाई शहर, बुथीदंग, तुंगबजार, पोलीस ठाणे तुंगबाजार, म्यानमार), २) मुज्जमील मोहमद अमीन खान (वय ४३, मुळगांव नांगचंग, तहसील मगदू, जि. रेकॉग, म्यानमार), ३) महिला आरोपी ४) महिला आरोपी यांच्या विरोधात देहुरोड पोलीस ठाण्यात ३५७/२०२४ विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ चे कलम १४, १४(a),१४ (b), १४ (C) पारपत्र अधि १९६७ चे कलम १२, पारपत्र, भारतात प्रवेश) १९५० चे कलम ३ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी १ व २ यांना अटक केली आहे. पोउपनि भंडारे पुढील तपास करीत आहेत.












