न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२४) :- अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने त्याचे वाहन हयगयीने, निष्काळजीपणे, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून मानवी जीवीतास धोका होईल अशा रितीने चालवले. फिर्यादी यांचे साडू दिलीप निवृत्ती बवले यांच्या हिरो होन्डा स्पेन्डर दुचाकीला धडक दिली. त्यांचा अपघात होवून ते राजमाता उड्डाणपुलाच्या खाली असलेल्या डिव्हायडरवरील सळयीवर पडले. त्यात गंभिर जखमी होवून उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
तसेच सदर वाहन चालक अपघातस्थळी न थांबता चालकाचे कोणतेही कर्तव्य न बजावता तेथून पळून गेला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. हा प्रकार (दि. २६) रोजी सायं ७.३० वा. चे सुमा. नाशिक पुणे हायवे रोड, कुदळे मारूती सुझुकी सर्विस सेंटर, गेट समोर, भोसरी येथे रोडवर घडला.
फिर्यादी ओमकार ज्ञानेश्वार झांजले (वय २९ वर्षे, कोथरूड पुणे) यांनी आरोपी अज्ञात वाहन चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ४६४/२०२४, भारतीय न्याय संहिता कायदा सन २०२३ चे कलम २८१, १०६ (१), १२५ (ए) १२५ (बी), मो. व्हि. अॅक्ट कलम १३२ (१) (क) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि शेख तपास करीत आहेत.


















