न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२४) :- कॉफी शॉपचा बोर्ड लावला. त्यासाठी कोणताही परवाना घेतला नाही. कुठलीही कॉफी हा पेय पदार्थ तसेच इतर कुठलेही खादय पदार्थ विक्री करण्यासाठी ठेवले नाहीत.
वरच्या मजल्यावर आतमध्ये अंधा-या खोलीत लाकडी प्लायवुडचे कपांर्टमेंट बनवले. त्यास बाहेरुन पडदे लावले. आतमध्ये सोफे ठेवुन मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली. हा प्रकार (दि. २७) रोजी दुपारी २.२० वा चे सुमारास कॅफे टाईम, गंगानगर, से.नं. २८/३/३ प्राधीकरण निगडी येथे उघडकीस आला.
याप्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-२ ने कारवाई केली. चैतन्य सुभाष रेंगडे (वय २३ वर्षे रा. संस्कृती दर्शन, केशवनगर वरुण हॉटेलजवळ कासारवाडी) याच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात ३४३/२०२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२९, १३१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोहवा वीर पुढील तपास करीत आहेत.


















