न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२४) :- सन २०२४ मध्ये आजपर्यंत २५ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १४८ आरोपींवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. नुकतीच पगार टोळी, दळवी टोळी, काळे टोळी या टोळयांवर देखील मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हिंजवडी पोलीस ठाणे येथील गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी १) सचिन साहेबराव पगार (टोळी प्रमुख) वय ३१ वर्षे रा. संतोषी माता नगर, एमआयडीसो सातपुर, शिदे गल्ली गंगापुर गाव, नाशिक, २) दिपक भगवान जाधव वय २६ वर्ष रा. कुशल सोनाली सोसायटी समोर, चाकण पुणे मुळ पत्ता मु.पो. पाथरी ता.जि. जळगाव ३) योगेश शिवाजी दाभाडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण १० गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
भोसरी पोलीस ठाणे येथील गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी १) ओमकार मल्हारी दळवी (टोळी प्रमुख) वय २२ वर्षे रा.वाघ यांच्या बिल्डींगमध्ये, राणजत्रा हॉटेल जवळ, च-होली फाटा, दिघी पुणे २) योगेश जगन्नाथ मुळे वय २१ वर्षे रा. मधुबन सोसायटी, देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहत, भोसरी पूर्ण ३) गणेश कृष्णा गवारी वय १९ वर्ष रा. समता शाळेजवळ, दत्त मंदिर शेजारी, चक्रपाणी वसाहत, भोसरी पुणे ४) विजय विरेंद्र चव्हाण वय १९ वर्षे रा. हनुमान कॉलनी, मस्जीद जवळ सदगुरुनगर, भोसरी पुणे ५) सचिन ऊर्फ पिरप्पा जगत्राध येरे वय २० वर्षे रा.लांडगे यांची रुम सोनाली हॉटेल मागे, धावडे वस्ती, भोसरी पुणे ६) तेजस चंद्रकांत डोंगरे वय २२ वर्ष रा. गुरुदत्त कॉलनी, धावडे वस्ती, भोसरी पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०७ गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
पिंपरी पोलीस स्टेशन येथील गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपी सुप्रिम राजु काळे (टोळी प्रमुख) वय २४ वर्षे रा. एक्साईड बॅटरी कंपनी समोर, शंकरनगर, चिंचवड, पुणे, २) अविनाश सुभाष पात्रे वय १९ वर्षे रा रा.एक्साईड बैटरी कंपनी समोर, शंकरनगर, चिंचवड, पुणे ३) विनायक दयानंद क्षिरसागर वय २० वर्षे रा.एक्साईड बॅटरी कंपनी समोर, शंकरनगर, चिंचवड, पुणे ३) सुरेश काटे रा.शंकरनगर, चिंचवड पुणे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर टोळी प्रमुख व त्याचे साथीदार यांच्यावर एकुण ०७ गंभीर गुन्हे केल्याची नोंद आढळून आलेली आहे.
या तीनही प्रमुख यांनी त्यांचे साथीदारांसह अन्य सदस्यांसाठी प्रत्येक गुन्हयात काही सामाईक व काही नवीन साथीदार यांना सोबत घेवून स्वतःची संघटीत टोळी तयार करुन अवैध मार्गाने आर्थिक फायदा मिळवण्याचे उद्देशाने स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किवा संघटनेच्या वतीने एकटयाने किंवा संयुक्तपणे, हिंसाचाराचा वापर करुन अथवा हिंसाचाराची धमकी देवून किंवा धाक दपटशहा दाखवुन टोळी प्रमुख व साथीदार यांनी हिंजवडी, भोसरी, एमआयडीसी भोसरी, महाळुंगे एमआयडीसी, पिंपरी, निगडी, गंगापुर, म्हसरुळ पोलीस स्टेशन हद्दीत खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरी, दरोडा घालणे, पळवुन नेवुन जबरी चोरी, घरफोडी, चोरी, वाहनाची तोडफोड करणे, सदोष मनुष्य वधाचा प्रयत्न करणे, बेकायदकशीर अग्निशस्त्रे व जिवघेणे हत्यारे जवळ बाळगणे, घातक शस्त्रे जवळ बाळगणे अशा प्रकारेचे गंभीरे स्वरुपाचे चढत्या क्रमाने गुन्हे दाखल आहेत प्रत्येक गुन्हा करताना त्यांनी वैयक्तिक व टोळीचे वर्चस्व वाढावे व आर्थिक फायदा व्हावा तसेच जनमाणसात दहशत रहावी हाच उद्देश ठेवुन टोळी प्रमुखाने गुन्हे केलेले आहेत.
या टोळीमधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळो बनवुन हिंसाचाराचा वापर करुन वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अतंर्गत कारवाई करण्याबाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला. सदर प्रस्तावामधील कागदपत्रांची छाननी करुन नमूद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (४) वा कलमांचाअंतर्भाव करण्याचे आदेश वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी पारीत केलेले आहे.












