- पक्षाकडून हडपसर आणि शिरूर विधानसभेच्या निरीक्षकपदी निवडी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांची “हडपसर विधानसभेच्या तर, कार्याध्यक्ष सागर तापकीर यांची शिरूर विधानसभेच्या निरीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशाने या निवडी करण्यात आल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या शिरुर लोकसभा निवडणुकीत भोसरी मतदारसंघात युवक आणि महिला संघटन प्रभावी ठरले. त्यामुळेच खा. अमोल कोल्हे यांना गड काबीज करणं सोप झालं. त्यामुळे मोठे मताधिक्य त्यांना मिळाले. इम्रान शेख यांनी भोसरीतून दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोशल इंजिनीअरिंग आणि बूथ कमिट्यांद्वारे खा. कोल्हे यांच्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. खा. कोल्हे यांनी जाहीर कबुली देत इम्रान शेख व त्यांच्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं होते. त्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी इम्रान शेख यांची हडपसर तसेच कार्याध्यक्ष सागर तापकीर यांची शिरूर विधानसभा निरीक्षकपदी नेमणूक करून त्यांना कामाची पावती दिली आहे.
याबाबत इम्रान शेख यांनी भोसरी विधानसभेत भाजप आमदार तसेच अजित पवार गटातील बलाढ्य टीम समोर असताना खा. कोल्हे यांना १ लाख १८ हजार इतक मताधिक्य मिळवता आलं. त्याचं कारण मतदार संघातील पक्षाचे एकनिष्ठ, प्रामाणिक कार्यकर्ते, युवक, महिला आणि अल्पसंख्याक समाजाचा मिळालेला पाठींबा. हा पाठींबा असाच कायम रहावा यासाठी खा. सुप्रिया सुळे आणि डॉ अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात पक्षश्रेष्ठीनी दिलेली जबाबदारी अगदी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मी कटिबद्ध आहे. पक्ष संघटन वाढीसाठी शरदचंद्र पवार साहेबांचे शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचे काम इमानेइतबारे करीत राहीन, असं सांगितल.


















