- अहमदनगर, जळगाव, सुरतमध्ये सायबर पोलिसांची छापेमारी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२४) :- नार्कोटिक्स डिर्पाटमेंटमधुन बोलत असल्याचे सांगुन पार्सलमध्ये ड्रग्ज, अंमली पदार्थ असल्याने ते कस्टम विभागाने पकडले असुन अटकेची भिती घालुन महीलेची २४,९९,९९८ रुपयांची फसवणुक करणाऱ्या चार आरोपींना अहमदनगर, जळगाव, सुरत येथुन पिंपरी चिंचवड सायबर कडुन ताब्यात घेऊन गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे.
१) स्वरुप अशोक खांबेकर, वय ४२ वर्ष, रा. साईकृपा, इंदिरापथ, संभाजी चौकाजवळ, कोपरगाव, जि. अहमदनगर, २) पुष्कर चंद्रकांत पाखले रा. प्लॉट नंबर ३९, सिधुरत्न, करगांव रोड, विदयुत लता कॉलनी समोर, चाळीसगाव, जळगाव, ३) मोनिक भरतभाई रंगोलिया रा. ए १६. महालक्ष्मी सोसायटी, पुनाग्राम, योगी चौक, सुरत ४) कौसिक मन्सुखभाई बोरड रा. २१०, हरिकुंज सोसायटी, चिकुवाडी, वराच्या रोड, सुरत अशी अटक आरोपींची नावे आहेत.
हिंजवडी येथे राहणाऱ्या एका महीलेस आरोपीनी मोबाईलवर कॉल करुन फेडेक्स इंटरनॅशनल कुरीअर सर्विसेस मधुन बोलत असल्याचे सांगुन त्यांचे नावाचे मुंबई येथुन इराणला पाठविलेले पार्सल फेडेक्स इंटरनॅशनल कुरीअर सर्विस येथे मुंबई कस्टम डिपार्टमेंटचे अधिकारी यांनी पकडले आहे. त्यामध्ये ड्रग्ज, अंमली पदार्थ, ०५ क्रेडीट कार्ड, १ लॅपटॉप व ५ एक्सपायर्ड इराणी पासपोर्ट असुन पार्सलसाठी त्यांचे आधारकार्ड वापरले असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादी यांनी घाबरुन कोणतेही पार्सल पाठविले नसल्याचे सांगितले. त्यावेळी समोरील मोबाईलधारकाने तुम्ही तक्रार करु शकता, तुमचा कॉल नार्कोटिक्स डिपार्टमेंटला ट्रान्सफर करतो, तुम्ही त्यांच्याकडुन क्लिअरन्स सर्टीफिकेट घ्या, असे सांगुन कॉल ट्रान्सफर केल्याचा दिखावा केला.
समोरुन नार्कोटिक्स क्राईम डिपार्टमेंटमधुन बोलत असल्याचे सांगुन स्कायपी अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास भाग पाडले व त्यावरुन महीलेच्या नावाचे आधारकार्ड, बँक खात्याचा वापर मनी लॉड्रिग, ड्रग ट्रैफिकिंगसाठी केला जात असल्याचे सांगितले. त्यामध्ये अटकेची भीती घातली. त्यामधुन बाहेर निघण्यासाठी पोलीस म्हणुन मदत करीत असल्याचे दाखवुन महीलेस स्कायपी कॉल करुन स्क्रिन शेअर करण्यास सांगुन महीलेच्या दोन्ही बँकांची माहीती घेतली. अकाऊंटवर बॅलन्स असल्याचे पाहुन आरबीआयकडुन खात्याची वैधता चेक करण्याचे कारण सांगुन, खाते सर्वेलन्समध्ये असल्याचे, हॅकर्सने सर्व हॅक केले असल्याबाबत इत्यादी वेगवेगळी कारणे सांगुन पोलीस असल्याचा विश्वास संपादन करुन वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये एकुण २४,९९.९९८ रुपये भरण्यास भाग पाडुन महीलेची फसवणुक केली. याबाबत महिलेने हिंजवडी पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने गु.र.नं. ८८२/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३३६(३), ३४०(२), ३१८(२), ३१६(२) सह माहिती तंत्रज्ञान कायदा २००० कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास हिंजवडी पोलीस ठाणे येथे चालु असुन वरिष्ठाचे आदेशाने गुन्हयाचा समांतर तपास सायबर सेल मार्फत सुरु होता.
सायबर सेल कडुन सदर गुन्हयाचा समांतर तपास चालु असताना गुन्हयातील आरोपीनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले बँक खातेधारक हा कोपरगांव, जिल्हा अहमदनगर येथिल असल्याबाबत निष्पन्न केले. तो सध्या अहमदनगर येथे असल्याची माहिती प्राप्त केली. आरोपी स्वरुप यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचेकडे कौशल्यपुर्वक तपास करता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांचे मदतीने संगनमताने केला असल्याचे सांगितले. तात्काळ जळगाव व सुरत येथे जावून साथीदार यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी करता त्यांनी गुन्हा केलेची कबुली दिलेने त्यांना पुढील तपासकामी हिंजवडी पोलिस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींनी वापरलेले एस.बी.आय बँकेच्या अकाऊंटला २ कोटीपेक्षा जास्त ट्रान्झेक्शन झाल्याचे निष्पन्न झाले असुन त्या बँक अकाऊंट विरुध्द भारत भरातुन ६८ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. मागील ०५ महीन्यात सायबर सेलकडुन महाराष्ट्र व इतर राज्यातुन ५० आरोपी पकडुन २४ गुन्हे उघड केले आहेत.
नागरीकांना आवाहन…
अशा प्रकारे येणा-या फसव्या फोनला घाबरून जाऊ नये. तसेच अनोळखी कॉलवर विश्वास न ठेवता नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन खात्री करुन घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, वैयक्तीक माहीती शेअर करु नये.