- आईकडील नातेवाईक तरुणाकडून तरुणीशी प्रतारणा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२४) :- आईकडील नातेवाईक तरुणाने वेळोवेळी तरुणीला फोन करुन जिव देण्याची धमकी दिली. तरुणीच्या मनास लज्जा उत्पन्न करुन, पाठलाग केला. ईच्छा नसताना देखील फोन व मेसेज करुन, त्याने त्याच्या मोबाईलवर काढलेले सेल्फी फोटो, मोबाईल व लॅपटॉपवर सेव्ह केले.
‘तु मला भेटली नाही तर फोटो व्हायरल करीन, अशी धमकी दिली. तरुणीबरोबरचे त्याचे सेल्फी फोटो व्हाटसअॅप व सोशल मिडीयावर व्हायरल करुन तरुणीची बदनामी केली. हा प्रकार नोव्हेंबर २०१९ पासुन ते दि २८/०७/२०२४ दरम्यान राहते घरी खंडोबा माळ भोसरी, जेएसपीएम कॉलेज, ताथवडे या ठिकाणी घडला.
याप्रकरणी विशाल चंद्रकांत जाधव (वय २७ वर्षे, रा. खामकरवाडी, अंबरनाथ जि.ठाणे) याच्या विरोधात फिर्याद नोंदविण्यात आली असून भोसरी पोलिसांनी ४७९/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ७४,७८,३५१ (२), ३५१ (४), ३५६ (२) लैंगिक अपराधांपासुन बालकांचे संरक्षण अधि. २०१२ चेकलम ८,१२ प्रमाणे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.