न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२४) :- एक तास दरवाज्या, खिडक्या ठोठावून आतमध्ये झोपलेला १२ वर्षांचा मुलगा दरवाजा उघडत नव्हता. आपल्या मुलासाठी त्याचे आई वडील प्रचंड व्याकूळ झाले होते. अखेर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलास याबाबत माहिती देण्यात आली.
यशोमंगल हाउसिंग सोसायटीत, तिसऱ्या मजल्यावर सचिन शेवाळे यांचं घर आहे. या घरात सचिन शेवाळे यांचा बारा वर्षाचा अथर्व शेवाळे हा मुलगा काल घरात कुणी नसताना गाढ झोपेत झोपलेला होता. सचिन शेवाळे हे घरी आल्यानंतर त्यांनी जवळपास तासभर घराच्या दाराला ठोठावत, तसेच घराची बेल वाजवत आपल्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा गाढ झोपेतून उठतच नव्हता.
अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मशीनच्या मदतीने सेफ्टी डोअरचं लॉक कट करून दरवाजा उघडला आणि आत प्रवेश केला. यावेळी सचिन यांचा १२ वर्षाचा मुलगा गाढ झोपत होता. अग्निशमन दलाने अशाप्रकारे गाढ झोपेत असलेल्या मुलाची सुटका केलेली आहे. मुलगा गाढ झोपेतून सुखरूप उठल्यानंतर पालकांनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टकेचा श्वास घेतला.