न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२४) :- शिवछत्रपती क्रिडा पुरस्कार मिळवण्यासाठी सरावासाठी असलेल्या खेळाडुचे प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे. दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या मुलाच्या नावाचा १०० रुपये दराचा स्टॅम्प पेपर घेवुन त्यावर बनावट प्रतिज्ञापत्र तयार केले.
ती कागदपत्रे शासनाला सादर करुन शासनाची व फिर्यादीची फसवणुक केली आहे. हा प्रकार सन २०१९/२०, २०२०/२१, २०२१/२२ सालामध्ये प्रभात रोड, एरंडवणे, पुणे येथे घडला.
फिर्यादी गणेश पोपट पाटील यांनी आरोपी आशुतोष मुरलीधर जगताप (रा पुणे. पुर्ण पत्ता माहीती नाही.) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ९१५/२०२४ भादवि कलम-४२०, ४६४, ४६७,४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि धुमाळ तपास करीत आहेत.















