न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२४) :- वांरवार पाठपुरावा करुनही विक्री कराची थकबाकी भरली नाही. कार्यालयाने वांरवार पाठपुरावा केला. एकुण १,१९,२२,३१८ रुपये थकबाकी व्हॅट कायदा अंतर्गत २००९-१० व २०१०-११ या कालावधीचे निर्धारणा आदेश कार्यालयाकडुन पारित करण्यात आलेले आहेत.
त्याची मागणी नोटीस सुध्दा पारित करण्यात आलेली आहे. तरीही व्यापाऱ्याने कर थकविला आहे. ही घटना (दि १२/०८/२०१४ ते आजपर्यंत) विश्वमाला हौसींग सोसायटी, तळवडे येथे घडली.
याप्रकरणी वस्तु व सेवाकर भवन, येरवडा यांनी आरोपी मेसस सिध्दार्थ सेल्स इंडस्ट्रीज प्रोप्रायटर असुलाल एच. बिष्नोई यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. चिखली पोलिसांनी ४५१/२०२४ महाराष्ट्र राज्य मुल्यवर्धित कर कायदा २००२ मधील कलम ७४ (२) ७४ (३) (ए) (द्य) ७४(५) प्रमाणे व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. सपोनि खारगे तपास करीत आहेत.














