न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ ऑगस्ट २०२४) :- चौघांनी तीन गुंठ्याच्या प्लॉटवर काही एक संबंध नसतांना त्याची विक्री केली. त्याजागी फिर्यादी यांचा प्लॉट नं २४ दाखवुन त्याचा बेकायदेशीर ताबा दिला.
फिर्यादीस तेथे येण्यास अडथळा केला. जागेत पाय ठेवल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. वारंवार सदरचा प्लॉट हा आम्हालाच विक्री करायचा व त्यापोटी आम्ही सांगु तो प्लॉट घ्यायचा, अशी खंडणी मागत समक्ष व फोनवरून वारंवार तशी धमकी दिली. तसेच प्लॉटचे कम्पाउण्ड तोडुन नुकसान केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सन २०२१ ते आजपर्यंत स नं ३८९ (जुना सनं ४४५), प्लॉट नं २४, चऱ्होली बु. येथे घडला. फिर्यादी जगन्नाथ दामोदर कांबळे ( वय ६७, धंदा सेवानिवृत्त) यांनी आरोपी १) रामदास पंडित काळजे, २) विकास काळजे ३) तुषार काळजे ४) अविनाश काळजे (सर्व रा रा काळजेवाडी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी ३३७/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४),३०८ (३),३१४,३१८ (२),३२९ (३),१२६(२), ३२४(१),३५२,३५१ (२), ४९,६१ (२) प्रमाणे चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि भामरे तपास करीत आहेत.















