न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मे २०१९) :- आपली राजसत्ता ख-या अर्थाने उपेक्षित आणि वंचित समाजासाठी खर्ची करणारे आरक्षणाचे प्रणेते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या पुण्यतीथी निमित्त पिंपरी चिंचवड काँग्रेस पदाधिका-यांच्या वतीने केएसबी चौकातील शाहू महाराज पुतळयाला आज सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, महाराष्ट्र एनएसयूआयचे माजी अध्यक्ष मनोज कांबळे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र महिला काँग्रेस उपाध्यक्षा निगार बारस्कर, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष हिराचंद जाधव, पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल, अशोक काळभोर, राजन पिल्ले, उमेश बनसोडे, संपत मुळे आदि उपस्थित होते.











