न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२४) :- संस्थेत झोपलेल्या बारा वर्षीय मुलाला झोपेतून उठवले. त्याला टि व्ही रूममध्ये नेलं. मुलाला मोबाईल गेम खेळण्यासाठी दिला.त्यानंतर मुलाशी अश्लील चाळे सुरु केले. मुलाने त्याला विरोध केला असता त्याचे तोंड बंद केले.
हा प्रकार (दि. १७) रोजी पहाटे ०५.०० च्या सुमारास श्री माउली कृपा अन्नदान संस्था, आळंदी येथे घडला. बारा वर्षीय बालकाने व्यंकटेश सर (व्यंकटेश काशिनाथ माडनुर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
आळंदी पोलिसांनी २२७/२०२४ बालकांचे लैगिंक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम ४, ६, ८ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहे. सपोनि साळी तपास करीत आहेत.












