न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑगस्ट २०२४) :- शेअर्स मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करुन भरपुर परतावा मिळवला असल्याचे स्क्रिन शॉट ग्रुप मध्ये शेअर केले. विश्वास संपादन करुन लिंक शेअर केली. अॅप डाऊनलोड करण्यास सांगुन वेगवेगळे बँक डिटेल्स व्हॉट्सअॅप वरुन दिले. वेळोवेळी अॅप व्दारे शेअर्स व आय.पी.ओ खरेदी करण्यासाठी एकुण ०७,६१,८६४ रुपये पाठवण्यास भाग पाडले. नंतर अॅप व संपर्क करणे बंद करुन ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि.०५/०३/२०२४ ते दि.०४/०७/२०२४ पर्यंत) व्हॉट्सअॅप ऑनलाईन पध्दतीने राहत्या घरी घडला. फिर्यादी (वय ३३ वर्षे, धंदा व्यवसाय सिव्हिल कॉन्ट्रक्टर, रा. जुनी सांगवी) यांनी आरोपी १) market maker training plan 41 group मधील राहुल हेमराजनी (प्रोफेसर) मो.नं. +1-3329104271, २) मितेशजैन (असिस्टंट) मो.नं. +1-3322077174 +1-6463358228 ३) सिआलीया पांडे (असिस्टंट) मो.नं. +1-2126581170 +13322484295, ४) इमली (सर्व्हिस प्रोव्हाईडर) मो.नं.अ१-३३२२७२१७५२, ५) लिंक https://app.ngtjissy.xyz/bgpq4n लिंक धारक, ६) गृपला. रजि नं.९३६६५१९६८२ यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
सांगवी पोलिसांनी ३३०/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६ (२), २ (३४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. वपोनि बनसोडे तपास करीत आहेत.















