न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ ऑगस्ट २०२४) :- सराईत दुचाकी चोरटयाकडुन चोरीच्या गुन्हयांची उकल करीत दोन लाख रुपये किंमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. चाकण पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाने ही कारवाई केली आहे.
विकास हरीभाऊ आगरकर (वय ३२ वर्षे, रा. आगरवाडी, चाकण ता. खेड जि. पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. (दि. २३) रोजी पोलीस पेट्रोलींग करीत असताना आरोपी पोलीसांना पाहुन पळुन जाण्याच्या तयारीत असताना दिसला.
दरम्यान डी. बी. पथकाने त्याला शिताफीने पकडले. प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून टीव्हीएस ज्युपीटर, ३ हिरो स्पेलंडर, सीबिझेड होंडा, हिरो होंडा पेंशन अशा प्रकारे एकुण सुमारे २,००,००० रुपये किंमतीच्या सहा चोरीच्या दुचाक्या जप्त केलेल्या आहेत.
पाच गुन्हे चाकण पोलीस ठाणेकडील असुन जप्त मोटार सायकलचा तपास चालु आहे. आरोपी विकास हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर यापुर्वी मोटार सायकल चोरीचे चाकण पोलीस ठाण्यात एकुण ०९ गुन्हे दाखल आहेत. आरोपीची (दि. २५) पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे.












