- पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट चारने घातल्या तरुणाच्या हातात बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- यु ट्युबवर वाहने चोरी करण्याचे व्हिडीओ पाहुन दुचाकी चोरी करणाऱ्या आरोपीस गुन्हे शाखा, युनिट-४ ने अटक केली आहे. त्याच्याकडून ८,९०,००० रु. किं. च्या १८ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वाहन चोरीचे एकुण १६ गुन्हे उघडकिस आणण्यात आले आहेत.
अभिषेक मल्लाप्पा हावळेकर (वय-२१ वर्षे, रा-साई दर्शन कॉलनी, शाहुपुरी, सातारा, सध्या रा. आंबेठाण गार्डन समोर, आंबेठाण, चाकण, ता-खेड, जि-पुणे) असं अटक आरोपीचं नाव आहे.
दरम्यान स्नेहराज अपार्टमेंट, बाणेर-म्हाळुंगे रोड येथे एकाच सोसायटीमधुन एक बुलेट व एक प्लसर मोटार सायकल चोरी झाल्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी ७० ते ८० सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची पाहणी करण्यात आली. पोलिसांची तीन पथके तयार करण्यात आली. अभिषेकला दाखल गुन्हयात (दि. २०) रोजी अटक केली. त्याने दाखल गुन्ह्या व्यतिरिक्त इतर गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्याकडुन गुन्हयात चोरीस गेलेल्या व इतर दोन अशा एकुण ८,९०,००० रु.किं, च्या १८ महागड्या मोटारसायकल जप्त करुन वाहन चोरीचे एकुण १६ गुन्हे उघड उघडकिस आणले आहेत.
आरोपी अभिषेक हा सातारा येथुन घरी भांडण झाले म्हणुन घरातुन निघुन आला होता. त्याने यु ट्युबवरुन गाडी कशी चालु करायची तसेच तिचा हॅन्डल लॉक कसे तोडायचे हे पाहुन तो दुचाकी चोरी करत होता. तसेच तो हायवे लगतच्या गाड्या चोरी करत असे. जेणेकरुन सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्यामध्ये तो येणार नाही. त्याने पुणे, पिंपरी चिंचवड व सातारा परिसरातुन मोटारसायकल चोरी केल्या आहेत. दाखल गुन्हयाचा पुढील तपास पोउपनि मयुरेश साळुंखे, गुन्हे शाखा, युनिट ४, पिंपरी चिंचवड हे करत आहेत, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस उप-आयुक्त यांनी दिली आहे.












