- महावितरणकडून महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२४) :- महावितरण खराळवाडी उप-विभाग, पिंपरी गाव येथे अति. कार्यकारी अभियंता या पदावर तक्रारदार हे नोकरीस आहेत.
दरम्यान महीलेने खराळवाडी उपविभाग पिंपरी पुणे येथे ऑनलाईन अॅप्लीकेशनव्दारे दुसऱ्याच्या नावाच्या विज बिलात तीचे नाव लावण्यासाठी व विज बिल सुरक्षा ठेव हस्तांतरीत करण्यासाठी संमतीशिवाय एक्स फॉर्मवर बनावट स्वाक्षरी करुन शासनाची फसवणुक केली आहे, असं फिर्यादीत म्हटल आहे.
हा प्रकार (दि. १५) रोजी पिंपरीत घडला. पिंपरी पोलिसांनी तक्रारीवरून ८३८ /२०२४ भा.दं.वि. ४२०, ४६५,४६७, ४७१ प्रमाणे महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मुदळ पुढील तपास करीत आहेत.















