- चिखली साने चौकातील सिध्दीविनायक ज्वेलर्समधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२४) :- चिखली साने चौकातील सिध्दीविनायक ज्वेलर्स येथे (दि. २०/१०/२०२३ ते दि. २५/०९/२०२४) फिर्यादी व फिर्यादी यांच्याप्रमाणेच एकुण ४४ साक्षीदारांचा विश्वास संपादन करुन सोने गहाण ठेवीवर बँकेपेक्षा कमी व्याजदराने म्हणजेच १ टक्के व्याजदाराने सोने गहाण ठेवुन पैसे देतो, असे अमिष दाखवले.
फिर्यादी व इतर साक्षीदार यांचे अंदाजे एकुण १,५२,६०,००० रुपये किंमतीचे, २१८ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने स्वतःजवळ गहाण ठेवुन घेतले. सोने गहाण ठेवलेबाबतचे कार्ड देवुन, स्वतःचे सिध्दीविनायक ज्वेलर्स नावाचे दुकान बंद करून कोठेतरी पळून गेले आहेत. तसेच काही साक्षीदारांकडून गहाण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांची मुद्दल रक्कम परत घेवुन त्यांना त्यांचे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने परत दिले नाहीत. तसेच काही साक्षीदारांकडून सोन्याचे दागिने बनवुन देतो असे सांगुन त्यांच्याकडुन दागिन्यांचे पैसे घेवुन त्यांना दागिने बनवुन दिले नाहीत अथवा त्यांचे पैसे देखील परत दिलेले नाहीत, असं फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी संतोष महादेव थोरात यांनी आरोपी १) गणेश आनंदा हाके २) दिनेश आनंदा हाके दोन्ही राह शिवतीर्थ सोसायटी, कृष्णानगर, चिंचवड पुणे मुळ राह डाकेवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चिखली पोलीस ठाण्यात ६१४ /२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४),३१६ (२) प्रमाणे, महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम १९९९ ते कलम ३ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलदार सपोनि बाबर चिखली पो.स्टे. पुढील तपास करीत आहेत.











