न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑक्टोबर २०२४) :- वडगाव मावळातील उप अधिक्षक, भूमि अभिलेख कार्यालयात गोडंब्रे येथील गट क्र २३ मधील जमीनीची मोजणी करून हद्द निश्चितीसाठी अर्जदाराने अर्ज केला होता.
दरम्यान भुकरमापक हे जमीन मोजणीसाठी (दि. १०) रोजी सायंकाळी ०५.१० ते ०५.३५ वा. तिथे गेले होते. त्यावेळी चौघांनी त्यांच्यासोबत झटापट करून मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातून अभिलेख हिसकवण्याचा प्रयत्न केला, असं फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी रोहीतकुमार रामकृष्ण जाधव (भुकरमापक उप अधिक्षक भूमि अभिलेख वडगाव मावळ) यांनी आरोपी १) गिरीश आगळे २) राजाराम बाळासाहेब आगळे (वय ४८ वर्षे) ३) मिलीद आगळ ४) आकाश आगळ (सर्व रा. गोडंब्रे ता. मावळ जि. पुणे) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
शिरगाव पोलिसांनी २२८/२०२४ बी.एन.एस. कलम १३२, ३ (५) अन्वये चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पो उपनि केंद्रे पुढील तपास करीत आहेत.















