न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२४० :- भारत विरुद्ध न्युझीलंड कसोटी क्रिकेट सामना (दि. २४ ते दि. २८) रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे स्टेडीयमवर होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षक खाजगी वाहनांनी मोठ्या प्रमाणात येणार असल्याने परिसरात वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे परिसरात देहुरोड वाहतूक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत.
ज्या वाहनधारकांकडे (व्ही. व्ही.आय.पी/व्ही.आय. पी/इतर अत्यावश्यक सेवा) वाहनाचा पास असेल अशा वाहनांना स्टेडियमकडे जाताना द्रुतगती महामार्गाच्या उजव्या बाजूच्या सेवा मार्गाचा पर्याय देण्यात आला आहे.
१) मुंबईकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग खालीलप्रमाणे
अ) द्रुतगती मार्गाचे देहूरोड एक्झिटमधून डावीकडे वळावे. त्यानंतर तात्काळ परत डावीकडे वळून एक्सप्रेस हायवे लगतच्या मामुर्डीगावच्या बाजुस असलेल्या सर्विस रोडने स्टडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
ब) द्रुतगती मार्गावरुन येणारी वाहने किवळे ब्रिजवरुन मुकाई चौक येथुन यु टर्न घेऊन कृष्णा चौक मार्ग एक्सप्रेस लगतच्या सिम्बॉयसेस कॉलेजच्या बाजुकडील असलेल्या सर्विस रोडने स्टेडियमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
क) शितलादेवी मंदीर येथुन डाव्या बाजूस वळवून लेखा फार्म मार्गे असलेल्या सर्विस रोडने स्टेडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करावा.
ड) सेंट्रल चौक मार्गे मुकाई चौकात येणारी वाहने किवळे ब्रिज खालून कृष्णा हॉटेल शेजारुन मामुर्डी अंडर- पासचे डाव्या बाजूने अथवा एमएच ०४ बोगद्यातून डावीकडे वळून कुणाल आयकॉन चौकाकडून पुढे दर्शविलेल्या पार्किंगकडे जातील.
मनाई :-
१) जुना मुंबई पुणे हायवेने येणारी वाहने सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक मार्गे बेंगलोर हायवे वरील मामुर्डी जकातनाका जवळील अंडरपास व रस्त्याने येणारे प्रेक्षकाच्या वाहनांना शितलादेवी मंदीर येथून मामुर्डी गावात येण्यास बंदी करण्यात येत आहे.
२) पुणे बाजुकडून येणा-या प्रेक्षकांच्या वाहनांसाठी मार्ग खालीलप्रमाणे…
अ) पुणे बंगलोर महामार्गावरुन पवनानदी ब्रिज, हॉटेल सॅन्टोंसा पास करुन किवळे ब्रिज वरुन वाहने डाव्या बाजुकडे वळवावी व २०० मिटर वरुन द्रुतगती मार्गाचे डाव्या बाजुने असलेल्या सर्विस रोडने स्टडीयमकडे व पार्किंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करतील.
ब) निगडी, हँगिंग ब्रिज कडून येणारे प्रेक्षकांची वाहने रावेत चौक, भोंडवे चौक, मुकाई चौक मार्ग कृष्णा चौक येथून उजव्या बाजुस वळुन परत एक्सप्रेस हायवे पासून डाव्या बाजुस वळुन असलेल्या सर्विस रोडने स्टडियमकडे व पाकिंगकडे जाण्याच्या मार्गाचा अवलंब करतील.
१) गहुंजे पुल ते वाय जंक्शन मार्गे स्टेडियमकडे फक्त कार पासधारक वाहनांना तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांना प्रवेश देण्यात येईल.
१) मामुर्डी गावातील रूहिझ बिर्यानी ते मासुळकर फार्म बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी
पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहने मामुर्डी जकातनाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
२) मरीमाता चौक किवळे नाला येथुन मासुळकर फार्म बाजुकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहने कृष्णा चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
२) सामना संपल्यानंतर मुकाई चौक बसस्टॉप कडुन किवळे अंडरपासमार्गे मुंबई तसेच किवळे बाजुकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहतूकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग :- सदर मार्गावरील वाहने मुकाई चौक येथून डावीकडे वळून समीर लॉन्स किवळे गाव मार्गे इच्छित स्थळी जातील.
मामुर्डी ते कानेटकर बंगला तसेच मामुर्डी ते गहुंजे स्टेडीयम कडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना सकाळी ७.०० ते ११.०० व सायंकाळी १६.०० ते १९.०० वाजेदरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
कृष्णा चौक ते मामुर्डी अंडरपास मार्गे तसेच जुन्या पुणे मुंबई महामार्गाचे शेजारील मामुर्डी गावचे बाजुस असलेल्या सर्विस रोडने गहुंजे स्टेडीयम कडे जाण्या-येण्यास सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना सकाळी ७.०० ते ११.०० व सायंकाळी १६.०० ते १९.०० वाजेदरम्यान प्रवेश बंद करण्यात येत आहे.
१. वाहनचालक दिलेल्या मार्गाचाच वापर करतील. कोणीही मामुर्डी गावातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करु नये.
२. स्टेडियमकडे जाणारे सेवा रस्ते अतिशय अरुंद असल्यामुळे वाहनचालकांनी डबल लेन / ओव्हरटेकिंग न करता सिंगल लेनमध्ये वाहने चालवून सहकार्य करावे.












