न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ ऑक्टोबर २०२४० :- नार्कोर्टीक्सचे पोलीस अधिकारी असल्याचे व कुरीयरमध्ये ड्रग्ज मिळाल्याचे खोटे सांगुन त्यामध्ये अटकेची भिती घालुन एकुण १२ लाख रुपयांची फसवणुक करणाऱ्या सिकर, जोधपुर, राजस्थान येथील ०४ आरोपींना सायबर पोलीसांनी अटक केली आहे.
वाकड येथे राहणाऱ्यास आरोपींनी तक्रारदारास व्हॉट्सअॅप टेलिग्रामद्वारे व्हिडीओ कॉल करुन फेडेक्स कुरीयर मधुन बोलत असल्याचे सांगुन मुंबई कस्टम डिपार्टमेंटला तुमचे कुरीयरमध्ये १०० ग्रॅम ड्रग मिळुन आले असल्याचे सांगितले. पार्सलला तुमचे नांव व आधार नंबर लिंक आहे. त्यासाठी तक्रार करण्यास मदतीचे बहाण्याने मुंबई नार्कोटिक्स डिपार्टमेंटमधुन मोठ्या हुद्याचे पोलीस अधिकारी बोलत असल्याचे भासवले. तक्रारदारास अटकेची भिती घालुन क्लियरन्स सर्टीफिकेटच्या नावाखाली विश्वास संपादन करुन फिर्यादी यांना वेगवेगळ्या बँक अकाऊंट एकुण १२,२२,१३३/-रुपये भरण्यास भाग पाडुन आर्थिक फसवणुक केली. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होती.
जोधपुर, राजस्थान येथील काही इसम पिसोळी, उंड्री भागात काही दिवसापासुन येवुन राहत असल्याबाबत तसेच त्यांचेकडे काळया रंगाची स्कॉर्पिओ कार असल्याबाबत माहीती मिळाल्याने त्या अनुषंगाने खात्रीपुर्वक माहीती काढुन नेमलेले पथकामार्फत एआरव्ही न्यु टाऊन सोसायटी, जगदंबा भवनजवळ, पिसोळी, पुणे येथे छापा टाकला. फ्लॅटमध्ये संशयीत आरोपी १) मोहम्मद इलियास मोहम्मद सदिक कलाल वय ३६ वर्षे, रा. वार्ड नं. १७, नगरपालिकाजवळ, लोसल, जि. सिकर, जयपुर राजस्थान २) मोहम्मद शाहिद अहमद अली वय २५ वर्षे रा. खेतन आडी मंडोर रोड, जोधपुर, राजस्थान, ३) पुरणसिंग रतन सिंग वय २४ वर्षे रा. किशोर बाग, मंडोर रोड, जोधपुर, राजस्थान. ४) नाजील खत्री मन्वरअली खत्री वय २९ वर्षे, रा. खेतन आडी मंडोर रोड, जोधपुर, राजस्थान हे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन१८ मोबाईलचे सिमकार्ड- ९०, लॅपटॉप- ०१, बँक पासबुक किट ६०, एटीएम/डेबिट कार्ड ६०, पासपोर्ट २, आधार कार्ड १५, पॅन कार्ड-०३, ड्रायव्हींग लायसन्स ०३, रोख १७०० रुपये फॉर्च्यूनर कार नं आर.जे. १९ युई ०००७, स्कॉर्पिओ कार आर. जे. १९ युजी ७०७० असे एकुण ७२,१७,२००/- रु. चे मुद्देमालासह मिळुल आले.
त्यांचेकडे कौशल्यपुर्वक तपास केला असता त्यांचा गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपासामध्ये आरोपी हे फसवणुकीचे रक्कमेतुन युएसडीटी मार्फत देशांतर्गत व परदेशात पैसे पाठवित असल्याची माहीती मिळून आली आहे. त्या अनुशंगाने अधिक तपास करणे, त्याचेकडे गुन्हा करण्यासाठी वापरलेले बैंक अकाउंट, त्यामधील व्यवहार, इतर साथीदार, त्यांचेकडे मिळुन आलेले मुद्देमालाबाबत, त्यांचा अशा प्रकारे किती गुन्हयामध्ये सहभाग आहे, इत्यादीबाबत तपास चालु आहे.
नागरीकांना आवाहन…
अशा प्रकारे येणा-या फसव्या फोनला घाबरुन जाऊ नये, तसेच अनोळखी कॉलवर विश्वास न ठेवता नजीकच्या पोलीस ठाण्यात जाऊन खात्री करुन घ्यावी. पोलीस अशा प्रकारे कोणालाही फोन करत नाहीत अगर डिजीटल अरेस्टची भिती घालत नाहीत. कोणत्याही परिस्थितीत आपला मोबाईल स्क्रिन, बैंक अकाऊंट, वैयक्तीक माहीती शेअर करु नये.