न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीबाबत माहिती देण्यासाठी शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आज गुरुवार (दि. १३) रोजी महापालिकेत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार व अमय खोपकर यांच्या मार्गदर्शनाखाली व रमेश परदेशी यांच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड शहर मनसेची चित्रपट सेनेची नविन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटक पदी सिनेकलाकर प्रज्ञा श्रीमंत पाटील, दत्ता घुले, उपसंघटकपदी तुकाराम शिंदे, दीपक भालेराव, प्रसाद खैरे, तर सचिवपदी शिवनाथ दिलपाक यांची निवड करण्यात आली आहे.
यापुढे चित्रपट क्षेत्रामध्ये कलाकार तत्रंज्ञापासून ते निर्मात्यापर्यंत जाणवणा-या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच पिंपरी चिंचवड शहरातील नविन कलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. चित्रपट सिनेमागृहामध्ये प्रेक्षकांना काही अडचणी असतील तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना अन्याय विरुध्द लढेल, असे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी सांगितले.