- एकूण ३८ पैकी ३५ जण निवडणुकीच्या रिंगणात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- मावळ लोकसभा मतदारसंघासाठी एकूण ३८ अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची आज शुक्रवारी (२६ एप्रिल) छाननी झाली. त्यापैकी संजय वाघेरे यांची मतदार यादीची सांक्षाकीत प्रत नसल्याने अर्ज बाद झाला आहे. त्यांना नोटीस दिली होती. पण, त्यांनी त्यांचे उत्तर दिले नाही.
तर, काँग्रेसचा ए, बी फॉर्म नसल्याने गोपाळ तंतरपाळे यांचा तर राष्ट्रीय वाल्मिकी सेना पार्टीचे राजेंद्र मानसिंह छाजछिडक यांचाही अर्ज बाद झाला आहे. तिघांचे अर्ज बाद झाले असून ३५ जणांचे वैध ठरले आहेत.
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील बंधारपाडा येथील संजय सुभाष वाघेरे आणि उरणमधील संजोग रवींद्र पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांचे नाव आणि आडनावाशी नामसाधर्म्य असलेल्या या दोन उमेदवारांनी अर्ज भरल्याने वाघेरे यांची कोंडी झाली होती. पैकी संजय सुभाष वाघेरे यांचा अर्ज बाद झाला आहे.