न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- इंडिया आघाडी च्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसोबत संवाद साधण्यासाठी डायलॉग ऑन डेव्हलपमेंट अँड डेमोक्रसी चे आयोजन काळेवाडी चौक, वाकड येथील हॉटेल ॲम्बिअन्स येथे शनिवार दि २७ एप्रिल २०२४ रोजी, संध्याकाळी ६ वाजता करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी व आम आदमी पार्टी, महाराष्ट्र चे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील, इंडिया आघाडी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील असणार आहेत.
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा महोत्सव 2024 लोकसभा निवडणुकीत होत असून भारतातील लोकशाही मूल्ये जपण्यासाठी नागरिकांचा सहभाग सर्वात महत्त्वाचा आहे. मतदारसंघातील मतदारांशी लोकशाही आणि विकास या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे अशी माहिती आम आदमी पार्टी महाराष्ट्र पदवीधर आघाडी चे अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी दिली.