न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०२४) :- विनापरवाना अवैधरित्या ५०,००० रु किं चे गावठी बनावटीचे पिस्टल व २०० रु किं चे एक जिवंत काडतुस असा एकुण ५०,२०० रुपये किंमतीचा ऐवज जवळ बाळगला. पोलीस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उलंघन करुन अवैधरित्या अनिशस्त्र बाळगले.
याप्रकरणी (दि. २५) रोजी रात्री ९.३५ च्या सुमारास कडाचीवाडी येथील चाकण शिक्रापुर रोडवर, गणपती मंदिराजवळ कारवाई करून भरत तुकाराम जैद (वय ३० वर्षे, रा. चिंबळी फाटा) याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
चाकण पोलिसांनी २८१/२०२४ भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोहवा सोनवणे तपास करीत आहेत.