न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मार्च २०२०) :- चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरी करणा-या चोरांचा पोलीस शोध घेत होते. त्यावेळी खब-यामार्फत चिखली, मोरेवस्ती येथील नाकोडा गॅस सर्व्हिस स्टेशन या दुकानाच्या पाठिमागे एका खोलीत विनापरवाना गॅसचा साठा केला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चिखली पोलिसांनी गोडाऊनवर छापा टाकला.
त्यात भरलेले १८ मोठे आणि छोटे १७ असे एकूण ३५ सिलेंडर पोलिसानी जप्त केले. मोठ्या सिलेंडरमधून गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चढ्या दराने विक्री करणा-या अमित महादेव साठे (वय १९, रा. भीमशक्तीनगर, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई आज (शनिवारी) चिखलीत करण्यात आली. चिखली पोलीस तपास करत आहेत.